Flying- A Gratifying Experience


sonali-for blog

Sonali, one of our Team members, recounts the joy of her first ever flying experience in her post…

ये….. विमान विमान विमान असं म्हणत आकाशातल्या विमानामागे धावताना कितीतरी मळ्या सहज पार करायचे आणि मग ते दिसे नास झालं की अरे गेलं😟असं तोंड पाडून पुन्हा घराकडे फिरायच, एवढ्याश्या विमानात लोक बसतात कशी? त्याच्यात म्हणे जेवण वैग्ररे पण मिळत आणि छान छान मुली पण असतात त्याच्यात आपली काळजी घ्यायला हे सगळं ऐकून होते मी आईला आपण कधी बुवा बसायचं या विमानात आणि त्यात बसायला खूप पैसे लागतात म्हणे ते कोण देणार पण काय पण होऊ दे आपण जायचं म्हणजे जायचं हे तेव्हा इ. ६ वीत असताना ठरवलं होतं मी😊
त्यानंतर जस जशी मोठे होत गेले कळलं की त्या छान छान पोरी म्हणजे हवाई सुंदरी तो एक प्रकारचा जॉब आहे आणि जर विमानात जायचं असेल तर आपल्याकडे हा एक पर्याय आहे पण मुंबईला आल्यावर कळलं की त्या साठी खूप खर्च होतो मग काय घरातून काही परवानगी नाही त्यासाठी मग अक्षरा मध्ये असताना सुनीता बागल मॅडम बोलल्या मी एका मीटिंग साठी जाणार आहे विमानातून उद्या तेव्हा त्यांना खूप उत्सुकतेने विचारल होत मला पण जायचं आहे ओ मी काय करू म्हणजे मला ही विमानात बसता येईल त्यांनी मला जवळ घेऊन समजावलं बाळा तू अजून लहान आहेस आता शिक्षण पूर्ण कर आणि स्वतः कमवायला लाग आणि मग जा कि तुझ्या हिमतीवर विमानात बसून जगाची सैर करायला, हाच प्रश्न मी यशो दिदि ला पण विचारला कि मी कधी जाणार मला कधी चान्स भेटणार तेव्हा दीदी बोलली बाळा चान्स भेटत नाही तो मिळवावा लागतो आणि तेव्हा पासून ठरवलं की विमानात बसण्यायोग्य बनवायचं राव स्वतःला आणि शेवटी वाचा ट्रस्ट आणि मेधा दीदी नी तोच चान्स मला दिलाच सहा महिन्यांन आधी कळलं की मी जाणार आहे बेंगलोर ला मीटिंग साठी मी म्हटलं वा नवीन शहर बघायला मिळेल काही दिवसांनी कळलं की मी विमानाने जाणार आहे आणि मग काय माझ्या आनंदाला पारावार उरला न्हवता.
Santacruz ला ट्रेन मधून जाताना लांबून उडणारी विमान इतक्या जवळून बघताना खूप छान वाटत होत कुतूहल प्रत्येक पावलावर होत कदाचित मला झालेल्या आनंदामुळे असेल कि मला विमान उडताना कोणत्याही प्रकारची भीती वाटलीच नाही.
काही वेळा सहज मिळालेल्या गोष्टीचा आनंद काय असतो ते आपल्या लक्षात येत नाही पण जेव्हा खूप प्रयत्नांनी यशस्वी होतो ना माणूस त्या वेळी प्रत्येक छोटी गोष्ट, छोटी स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद ना एखाद्या उत्सवा पेक्षा कमी नसतो तसच काहिसा आहे हा प्रवास माझ्या साठी 😊
आज पुन्हा एकदा माझी मीटिंग यशस्वी रित्या पूर्ण करून, निघालेय विमानाच्या स्वारीला. हा जो आनंद आहे ना तो शब्दात सांगण कठीणच पण स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि आपल काम मनापासून करत राहिलो कि सर्व सोपं असत.
आता कुठे ही सुरवात आहे अजून जग फिरायचं आहे …!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s